LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

करवाढ...पंढरपूर नगरपरिषदेचा मनमानी कारभार....

 


पंढरपूर प्रतिनिधी : - कार्तिकी यात्रा संपल्यानंतर पंढरपूर शहरातील विविध मालमत्ता धारकांना 27% मालमत्ता कर वाढीची नोटीस घरोघरी, दुकानामध्ये नगरपालिकेने वाटप केली आहे. तर काहींना १०० टक्के वाढ करण्यात आली आहे सदर नोटीसीमुळे पंढरपूर नगरपालिकेचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सदर नोटीसी मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकदम दुप्पट रक्कम एवढी रक्कम आपण नवीन कर योग्य मूल्य निर्धारण निश्चित केलेली आहे हे मुळातच बेकायदेशीर असून ही रक्कम कोणत्या तरतुदीयान्वये निश्चित केली गेली याबाबत कसल्याही प्रकारचा नोटिसीमध्ये खुलासा नाही. याउलट महाराष्ट्र सरकार प्रतिवर्षी वेळेवर व मुदतीत करमालमत्ता धारकांनी कर भरल्यास त्या रकमेमध्ये काही प्रमाणात ग्राहकांना सूट देत असते. त्यामुळे असे अचानक कसल्याही प्रकारचा कर वाढवता येत नाही.

 दरम्यान या नोटीसीमध्ये पाणीपट्टी मध्ये 30-40% वाढ करुन 4 वर्षे होत नाही तोपर्यंतच घरपट्टी मध्ये 30% वाढ सुचवली आहे. नगरपालिकेवर प्रशासन राज असल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालू आहे अश्या मनमानी कारभारास चाप लावणे विरोध करणे गरजेचे असताना शहरातील सत्ताधारी व विरोधी कोणीही याबाबत आवाज उठवलेला अजून पर्यंत दिसला नाही तर याबाबत नागरिकांनीच आपल्या हरकती नगरपालिकेत नोंदवाव्या अशा सूचना मात्र केल्या जात आहेत.

या संपूर्ण प्रकरणांमध्ये पंढरपूर नगरपालिकेतील प्रशासनाचा मनमानी कारभार पंढरपूरकरांच्या समोर आला आहे तर यावर वेळीच आवाज उठवणे गरजेचे झाले आहे.

याबाबत सर्व पक्ष, संघटनांनी व सर्वसामान्यांनी 12 डिसेंबर पर्यंत सदर करवाढीस विरोध केला तरच हि करवाढ रोखता येऊ शकेल तरी सर्व जागरुक नागरिक, राजकीय पक्ष , व्यापारी संघटना, सामाजिक संघटना यांनी आवाज उठवावा तर करवाढ रद्द होऊ शकते!  प्रत्येक नागरिकांनी करवाढीच्या विरोधात 12 डिसेंबर पर्यंत लेखी अर्ज दाखल करुन पोहच घ्यावी असे आवाहन निर्भीडच्या वतीने करण्यात येत आहे. 

Post a Comment

0 Comments