अवैध वाळु उपशाला अभय देणारे पंढरपुरचे प्रांताधिकारी व तहसिलदार यांना तातडीने निलंबित करा- अंकुशराव
पंढरपुर (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षांपासुन पंढरपुर तालुक्यातील चंद्रभागेच्या पात्रात बिनदिक्कतपणे अविरत वाळु उपसा होतोय, यामुळे चंद्रभागेच्या पात्राची अक्षरश: चाळण झालीय, पंढरपूरातील पुंडलिक मंदिर ते जुना दगडी पुल या ठिकाणी अवैध वाळुउपसा झाल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे याच खड्ड्यात बुडून अनेक भाविकांचा मृत्यु झालाय, पण जाणुनबुजून महसुल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे वाळु उपशाला अभय देणारे पंढरपुरचे तहसिलदार व प्रांताधिकारी या दोन्ही झोपलेल्या अधिकार्यांचे तातडीने निलंबन करा अशी मागणी करत या झोपलेल्या प्रशासकीय अधिकार्यांना जगे करण्याच्या उद्देशाने आज महर्षी वाल्मिकी संघटनेच्या वतीने वाळु उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात पडलेल्या खड्ड्यात झोपुन आंदोलन केले.
पंढरपुर शहर व तालुक्यात राजरोसपणे अवैधरित्या होणारा वाळुउपसा हा तालुक्यातील व शहरातील जनतेला माहिती आहे, आमच्या संघटनेने याबाबत विविध आंदोलनं करुन महसुल प्रशासनाचं याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु गेंड्याची कातडी पांघरलेले अधिकारी हेतुपरस्पर याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या अधिकार्यांचे आणि वाळुमाफियांचे चांगलेच लागेबांधे असल्याचं स्पष्ट होत असुन, कुंपनंच कुरण खात असल्याची चर्चा सबंध पंढरपुर तालुक्यात सुरु आहे. या दोन्ही अधिकार्यांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. कांही राजकीय नेतेमंडळींचा या दोन्ही अधिकार्यांना वरदहस्तही असण्याची शक्यता आहे त्यामुळेच हे अधिकारी निर्ढावलेले असुन त्यांना कोणत्याही प्रकारची भीती अथवा जबाबदारी नसल्याचे दिसून येत आहे. तरी यांची केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी व जर दोषी आढळले तर यांचे तातडीने निलंबन करावे, अशी मागणी यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली असुन हे अधिकारी जर आणखी या ठिकाणी कार्यरत राहिले तर चंद्रभागेच्या पात्राला बकाल केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे कर्तव्यात कसुर करणार्या या दोन्ही अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करुन यांचं निलंबन तातडीने करावे अन्यथा महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने मोेठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिलाय.
यावेळी गणेश अंकुशराव, भारत खेडेकर, धनंजय परचंडे, अनिल पवार, दत्तात्रय कोळी, सोपान अंकुशराव, भैया कांबळे, उमेश तारापुरकर, बाळासाहेब सावतराव, चंगु नेहतराव, धोंडीबा नेहतराव, पोपट खेडेकर, पिंटु करकमकर, अजय अभंगराव, वैभव माने यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित


0 Comments