LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री हरिहर शिव महापुराण कथा सोहळ्याचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात संपन्न

प्रतिनिधी :

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून सिंहोर येथील सुप्रसिद्ध पंडित पूजनीय श्री.प्रदीप मिश्रा महाराज यांच्या सुश्राव्य वाणीत चंद्रभागा मैदान येथे श्री हरिहर शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे..

पंढरपूर तसेच पंचक्रोशीतील लाखो भाविकांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. पूजनीय श्री.प्रदीप मिश्रा महाराज यांची कथा जगभरात अनेक ठिकाणी होत असताना, पंढरपूर येथे या कथेचे आयोजन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी अयोजन केले असता ही भाविकांसाठी एक उत्तम पर्वणी ठरत आहे..

पंढरपूर प्रदक्षिणा, यात्रा काढण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जाताना देखील महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या निमित्ताने पंढरपूरकरांनी पुन्हा एकदा जणू वारीचाच अनुभव घेतला..

दि.३१ डिसेंबर पर्यंत ही कथा दररोज दुपारी १ वाजता होणार असून यजमान श्री.अभिजीत धनंजय पाटील यांनी अधिकाधिक संख्येने भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments