पंढरपूर /प्रतिनिधी
अखेर पंढरपूर नगरपालिकेने केलेल्या जुलमीकरवाढिला स्थगिती. सोमवार दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर करांच्या या मागणीची दखल घ्यावी असे पत्र दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर प्रस्ताव सादर होईपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात येत आहे. असा शेरा मारून स्वाक्षरी केली आहे.
पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता करावर मोठी वाढ केल्याने पंढरपुरातील नागरिकांनी पालिकेला लेखी तक्रारी दिल्या आहेत. तर विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन विरोध केला आहे.
सदर करवाढ रद्द करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पंढरपुरातील नागरिकांवर जुलमी कर वाढच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायाचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला आणि करवाढ रद्द करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी १८ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून पंढरपूरकरांच्या मागणीच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि पंढरपूर नगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने केलेली करवाढ रद्द करण्याची विनंती केली होती. या देण्यात आलेल्या पत्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव सादर होईपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात येत आहे. असा शेरा मारून अखेर या जुलमी करवाढला स्थगिती दिली आहे. या आदेशामुळे आता पंढरपूरकरांवर लादण्यात आलेल्या करवाढ स्थगित करण्याचा निर्णय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


0 Comments