पंढरपूर प्रतिनिधी :-
पंढरपूर राज्याचे आराध्य दैवत येथे विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनाकरिता राजरोजपणे हजारो नागरिक राज्य तसेच परराज्यातून येत असतात परंतु ते येथिल चालु असलेल्या अवैद्य धंद्यांबाबत दर्शन घेऊन जाताना अतिशय तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसुन येत आहे याचे प्रमुख कारण म्हणजे की पंढरपूर शहर पंढरपूर तालुका व पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत दिवसरात्र असे खुलेआम पणे चालु असलेले विविध अवैद्य धंदे जुगार मटका दारू हाॅटेलवरील लाॅजिंगवर चालू असलेले वेश्या व्यवसाय यामुळे पंढरपूर या आध्यात्मिक नगरीचा राज्य भरात एक वेगळा बॅड मॅसेज जात आहे त्यामुळे निदान अतातरी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी याची वेळीच दखल घेऊन या अवैद्य व्यवसाईकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे कारण यापुर्वी पंढरपूर तालुक्यात अवैद्य धंद्यांवर कारवाई केली जात असतानाही अवैद्य धंदे सुरूच राहतील... कारण पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या त्यावेळी कमी पडत असल्याने तत्कालीन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पंढरपूर तालुक्यातील अवैद्य धंद्यांच्या परिस्थितीची माहिती देत या ठिकाणी पोलीस स्टेशन व कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी केली व त्या मागणीची तात्काळ दखल घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राच्या विषेश पोलीस महानिरीक्षक यांनी नूतन पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी यांची संख्या वाढवण्याच्या मागणीस मान्यता दिली त्या सर्व मागण्या मान्य झाल्या अस्तित्वात आल्या परंतु पंढरपूर तालुक्यातील अवैद्य धंद्ये माञ त्या तुलनेत आजही कमी झाल्याचे दिसून येत नाही त्या उलट त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अता पंढरपूर तालुक्यातील अवैद्य धंद्यांवर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विषेश पथकाची कृपादृष्टी पडणे गरजेचे बनले आहे


0 Comments