काही वर्षांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेतील पंढरपूरचे नगराध्यक्षच्या केबिनमध्ये लावण्यासाठी नाभिक समाजाच्या असलेले मानबिंदू अखंड नाभिक समाजाचा स्वाभिमान छत्रपती शिवराय साठी स्वतःच्या प्राण्याची आहुती देणारे हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद यांची प्रतिमा नगर परिषदेला पंढरपूर सकल नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आली होती.
परंतु पंढरपूर नगर परिषदेमध्ये प्रशासकीय कारभार असल्यामुळे नगराध्यक्षांची केबिन काही महिन्यांपासून बंद आहे पण त्या केबिनमध्ये लावण्यासाठी देण्यात आलेली शिवबा काशीद यांची प्रतिमा एका कोपऱ्यात धुळखात पडलेले सकल नाभिक समाज सभासद तुकाराम चव्हाण जितेंद्र भोसले व मनोज गावटे यांना समजले व त्यांनी काल जाऊन समक्ष पाहणी केली आज सकाळी सकल नाभिक समाजाच्या व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज करून श्री.संत.सेना महाराज मध्ये बोलवून घेतले व सदर घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर सकल नाभिक समाजाचे 25 ते 30 सभासद पंढरपूर येथील नगरपालिकेमध्ये जाऊन सदर घडलेला प्रकार मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर घातला व त्यांनी सुद्धा हा प्रकार खूप खंताजनक असल्याचे व्यक्त केले व त्या ठिकाणी त्या क्षणी धूळ खात पडलेली हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशिद यांची प्रतिमा तिथील शिपायांना आणायला सांगून त्याला स्वच्छ पुसून एक आधार स्थान देऊन हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशिद यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वतः फोटोचे पाया पडल्यावर झालेल्या प्रकारची माफी मागितली व सदरची प्रतिमा मुख्याधिकारी कॅबिन मध्ये लावण्याचे आश्वासन दिले.
त्याप्रसंगी सकल नाभिक समाजाचे मार्गदर्शक बबन काका शेटे किशोर भाई भोसले पांडुरंग डांगे विठ्ठल मामा भोसले सतीश चव्हाण जितेंद्र भोसले महेश माने तुकाराम चव्हाण मनोज गावटे सोमनाथ खंडागळे युवराज हडपत युवराज शिंदे महादेव शिंदे सागर शिंदे अनिल शेटे अविनाश शेटे अभिषेक शेटे राकेश देवकर महेश माने गादेगावकर अंकुश भोसले विजय माने स्वप्निल शिदे रोहित शिंदे आधी सकल नाभिक समाजाचे सभासद उपस्थित होते


0 Comments