LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार दिन विशेष “एक अक्षर संवाद” मुलाखत गाजली

प्रतिनिधी/- 

पत्रकार दिनाचे औचित्य साधून पंढरपूर परिसरातील पत्रकारांची मुलाखत - “एक अक्षर संवाद” हा एक आगळावेगळा उपक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत (आबा) पाटील दर वर्षी पत्रकार बांधवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करत असतात. पण तो कार्यक्रम कायम अनौपचारिक स्वरूपाचा असतो. या वर्षीचा कार्यक्रम म्हणजे एक अभिनव प्रयोग होता. एका राजकीय क्षेत्रातील कार्यरत व्यक्तीने पत्रकारांची मुलाखत घेणे हे अपेक्षेप्रमाणे उत्कंठावर्धक ठरले.

ज्येष्ठ पत्रकार श्री.बाळासाहेब बडवे यांच्यासह श्री.प्रशांत आराध्ये, श्री.अभय जोशी, श्री.राजाभाऊ शहापूरकर, श्री.महेश खिस्ते, श्री.सिद्धार्थ ढवळे, श्री.प्रशांत मोरे आदी मान्यवर पत्रकार बांधवांनी अत्यंत मार्मिक शब्दात प्रामाणिकपणे पत्रकारिता दशा, दिशा आणि अपेक्षित याबाबत संवाद साधला. आपल्या तत्वांच्या बाबत विचार मांडतानाच राजकीय क्षेत्र व प्रशासकीय अधिकारी वर्ग यांच्याकडून असलेल्या संवेदनशिलतेच्या अपेक्षा व्यक्त केल्या. पंढरपूरच्या विकासाबाबत सद्य परिस्थिती आणि विकासाबाबत अपेक्षा विस्तृत स्वरुपात मांडल्या.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बांधवाना ओळखले जाते समाजाचा आरसा म्हणून पत्रकार बांधव समाजात वावरत असतात. दि.६ जानेवारी रोजी पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सालाबादप्रमाणे यंदाही दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन साजरा केला..आगळावेगळा पत्रकार दिन साजरा करताना दैनंदिन जीवनात पत्रकार बांधव नेहमी राजकीय, सामाजिक कार्यात सर्वांच्या पुढे असतात परंतू त्यांची मते कधीच समाजापुढं मांडण्याचा योग आला नाही म्हणून मुलाखत घेतली असे अभिजीत पाटील यांनी एक अक्षर संवाद या उपक्रमातून पंढरपूर मंगळवेढा येथील पत्रकार बांधावाशी मुलाखत घेऊन मैफील रंगवली गेली.

एकंदरीत हा पत्रकार दिन हा एका वैचारिक मंथनाचे माध्यम ठरला. राजकारण्यांना काय वाटते यापेक्षा पत्रकारांना काय वाटते हे जाणून घेतल्यास जनतेच्या मनातील आवाजाला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यासारखे होते. या कार्यक्रमास असंख्य पत्रकारांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमानंतर त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आली.  

आपल्या अभिनव संकल्पनांसाठी प्रसिद्ध असलेले श्री.अभिजीत पाटील यांनी आणखीन एक अभिनव उपक्रम यशस्वी करून दाखवला अशी चर्चा रंगली होती.

Post a Comment

0 Comments