पंढरपूर प्रतिनिधी - येथील सामाजिक कार्यकर्ते मज्जीद मुलाणी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा वाढदिवस पंढरपूर नगर परिषद चे माजी नगरसेवक नागेश यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी यादव यांनी मुलाणी यांना हार नारळ फेटा घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार प्रमोद भोसले, अजय जाधव, राजू पठाण, रविकिरण पाटील, देवाभाऊ सुर्यवंशी, संतोष वाघमारे, रवि जिरे, विजय मस्के सुखदेव गवळी चंदन हलकटटी आदी मान्यवर उपस्थित होते. मुलाणी हे नेहमीच पंढरपूर शहरातील सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. दरम्यान मुलानी यांनी पंढरपूर नगरपालिकेतील पाणीपुरवठा च्या ठेकेदारीच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागातील जनतेची सेवा बजावली आहे.


0 Comments