*पंढरपूर दिनांक :- ०३/०१/२०२३ :-* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पंढरपूर शहर समन्वयकपदी विद्यमान उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांची निवड दै . सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून जाहीर करण्यात आली आहे.
सदर निवड शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत साहेब यांनी जाहीर केली असून. शिवसेना नेता व युवा सेना अध्यक्ष श्री. आदित्य ठाकरे साहेब व महाराष्ट्र राज्याचे समन्वयक श्री. विश्वनाथ नेरूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने संपर्कप्रमुख श्री. अनिल कोकीळ साहेब, सोलापूर जिल्हाप्रमुख श्री. संभाजीराजे शिंदे साहेब यांच्या शिफारसीने लंकेश काकासाहेब बुराडे यांची पंढरपूर शहर समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.
लंकेश काकासाहेब बुराडे हे जन्मापासूनच शिवसेनेत आहेत त्यांचे अजोबा व वडील हे १९८० पासून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेवून सामाजिक काम करीत आहेत, शिवसैनिक म्हणून स्वतःच्या वडिलांच्या नेतृत्वा खालीच त्यांनी कामास सुरूवात केली शिवसेनेच्या विधानसभा उमेदवारा साठी पोलिंग एजंट म्हणून कार्य बजावले, बूथ प्रमुख म्हणून ही कार्य बजावले, त्यानंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीरभाऊ अभंगराव यांनी त्यांच्या कामाची दाखल घेवून जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे आणि शहर प्रमुख रविंद्र मुळे यांच्या सहमतीने त्यांची शिवसेना पंढरपूर उपशहरप्रमुखपदावर निवड करण्यात आली.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून येणाऱ्या सर्व आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवित एक सच्छा शिवसैनिक त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिला कट्टर निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती
त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग नोंदवला आहे, रस्तासाठी आंदोलन, स्पीडब्रेकर बसवण्याची मागणी असो, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन माल मिळवून देणे, तहसील कार्यालय आवाराबाहेरील पार्किंग व्यवस्था संदर्भात, नगरपरिषद उद्याने चालू करण्याबाबत, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत,
तसेच छत्रपती शिवाजी महाराज, स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.मीनाताई ठाकरे तसेच विविध महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या ते मोठ्या प्रमाणात साजरी करत आसतात
तसेच जेष्ठ १०१ शिवसैनिकांचा सत्कार रक्तदान शिबिर स्वताच संपर्क कार्यालय वृध्दाश्रमात खाऊ वाटप कोरोना काळात मास्क, सेनिटायझर वाटप, अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप २३ जानेवारी स्व.बाळासाहेबांच्या जयंती निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम प्रधानमंत्री योजनेचा ५ लाखाचा विमा आदी कार्य त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून केली त्यांच्या कार्याची दखल घेऊन च त्यांच्यावर शहर समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.


0 Comments