LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

लातूर येथील भाविकांकडून मंदिर समितीच्या अन्नछत्रासाठी 50 हजाराची देणगी

व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती.

पंढरपूर (ता.11):- कै. सिमिताबाई तायाप्पा चव्हाण यांचे स्मरणार्थ श्री.तायाप्पा चव्हाण, रा. लातूर या दानशूर भाविकांकडून अन्नछत्रासाठी रुपये 50 हजार देणगी देण्यात आली. त्याबद्दल त्यांचा श्रींचा फोटो, उपरणे लाडू प्रसाद देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी विभाग प्रमुख श्री.बलभिम पावले, सहायक विभाग प्रमुख श्री.राजकुमार कुलकर्णी, श्रीमती मनिषा जायकर उपस्थित होत्या.

श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती मार्फत भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून श्री. संत तुकाराम भवन येथे दैनंदिन दु.12.00 ते 2.00 व सायंकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा दैनंदिन सुमारे 2800 ते 3000 भाविक लाभ घेतात. या अन्नछत्रात अन्नदान करण्यासाठी “अन्नछत्र सहभाग योजना” असून, या योजनेत किमान रू.7,000/- पासून पूढे रक्कम दिल्यास, इच्छित दिवशी अन्नछत्रात अन्नदान करता येते, अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

Post a Comment

0 Comments