LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भोसे येथे गाव चलो अभियानांतर्गत कार्यक्रम

 


मंगळवेढा प्रतिनिधी

   सामाजिक न्याय विभागाच्या 'अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा योजना' पूर्वीची 'दलित वस्ती सुधार योजना' व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना' या योजनांप्रमाणे राज्यस्तर व जिल्हास्तर अशा दोन्ही स्तरांवर विकास कामे राबविण्यात येत आहेत . या माध्यमातून केंद्र सरकार तसेच राज्यसरकार आपल्या देशातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी तसेच नवनवे उपक्रम राबवित असून समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र व लोकसेवा आयोग, अन्य स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करता यावा, या उदात्त हेतूने सुसज्ज अभ्यासिका सदनाचे काम तसेच बाकी अन्य योजना समाज मंदिर बांधणी तसेच सुसज्ज व्यायामशाळा, वाचनालये तसेच समाजसुधारणा विकास मंडळांची स्थापना करून समाजातील सर्व  घटकांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपले मोदी सरकार व राज्यसरकार योजना राबवित आहेत . लोककल्याणकारी योजनांची माहितीपुस्तिका सर्वांना देत, अडी अडचणी जाणून घेत आमदार दादाश्री यांनी समाजातील सर्व घटकांसमवेत चर्चा केली.

Post a Comment

0 Comments