मंगळवेढा प्रतिनिधी :-
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार .समाधान आवताडे यांचे आमदार निधीतून स्थानिक विकास२०२२/२३ कार्यक्रमांतर्गत पंढरपूर येथील शिवपार्वती नगरातील दैवत गणेश मंदिराच्या समोर मंजूर झालेल्या गणेश मंदिर सभामंडपाचे काम नुकतेच पुर्णत्वास आले होते
आज त्या सभामंडपाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार .समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले.
शिवपार्वती नगरातील दैवत गणेश मंदिर येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ पाहता ही सभामंडप वास्तू अतिशय गरजेची आहे. स्थानिक सामाजिक, सांस्कृतिक व सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन आणि नियोजन होण्यासाठी माझ्या विकास निधीच्या माध्यमातून साकार होणारी ही वास्तू नगराचे वैभव नक्की वाढवेल असा विश्वास आमदार दादाश्री यांनी व्यक्त केला.
यावेळी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सुधीर आबा भोसले,नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले,नगरसेवक प्रशांत शिंदे,मंजुश्री भोसले,दत्तू सर, राजूरकर साहेब,महादेव जेधे सर, शरीफ भाई शेख,विनोदराज लटके,संतोष डोंगरे,बापुसो गोडसे, राहुल गावडे,सोपान काका देशमुख, प्रथमेश बागल,स्वप्नील गायकवाड,रणजित पवार, रवी सुर्वे तसेच पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते....
0 Comments