संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेपी ची रथ यात्रा सुरू असताना त्याच्यावरती भारत सरकार लिहिणे आवश्यक असताना मोदी सरकार लिहिले असल्यामुळे सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी व सर्व काँग्रेस पदाधिकारी नगरपालिकेत आक्रमक झाले त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवरती धरले जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या मोदीचे सरकार आहे की भारत सरकार आहे हा सवाल उपस्थित करण्यात आला. केवळ आणि केवळ मतासाठी मोदी सरकार असे संबोधण्यात येत आहे रथास आमचा विरोध नाही पण भारत सरकार असे लिहावे अन्यथा हा रथ आम्ही पंढरपूरमध्ये फिरू देणार नाही अशा आशयाचे निवेदन प्रशासनाधिकारी माननीय सुनील जी वाळूजकर यांना देण्यात आले व त्यांनी ताबडतोब त्याची दखल घेत जनसंपर्क अधिकारी यांना तातडीने व्हाट्सअप वरती हे निवेदन टाकून व पंढरपूर मधील काँग्रेस आक्रमक झाली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर पंढरपूर मध्ये हा रथ काही दिसला नाही.
यावेळी निवेदन देताना सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी मा. अध्यक्ष समीर कोळी, युवक काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष बलदेव शिकलकर, अल्पसंख्याक अध्यक्ष अश्फाक सय्यद, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष दिलीप तात्या फडतरे, पंढरपूर मंगळवेढा सोशल मीडिया अध्यक्ष बाळासाहेब आसबे,जमीर मुजावर श्रीकांत देवकर, गणेश फडतरे ,दिलावर बागवान,मेहबूब बागवान ,मुर्शिद शेख, तुकाराम होरे गोरखनाथ कदम, युवराज जाधव रमेश ओहाळ ,बाळा हजारे व सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments