लोकसभा निवडणुकीपूर्वी सहा हजार आरोपी पुणे पोलिसांच्या रडारवर... पुणे पोलीस अँक्शन मोडवर कारवाईचा धडाका सुरुच : पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात कोणतेही गैरकृत्य होणार नाही याची जबाबदारी पोलिसांवर असून कायदा-सुव्यवस्था सर्वेतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी देखील मोठा निर्णय घेतला आहे. पुणे ग्रामीण पोलीस विभागां अंतर्गत शिरूर बारामती मावळ असे तीन लोकसभा मतदारसंघ असून. यासाठी ३ हजार १०२ मतदान केंद्र आहेत. याकरिता लागणारे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून. बारामती व शिरूर लोकसभा निवडणुकीच्या करिता अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या मतदार संघात ५ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. जानेवारीपासून २२ अवैध शस्त्र धारकांकडून शस्त्रे जमा करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आराखडा तयार करण्यात आला आहे. विविध गुन्ह्याअंतर्गत असलेल्या आरोपी तसेच अवैध शस्त्र धारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. आगामी सर्वात्रिक लोकसभा निवडणुकीकरिता पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले असून. निवडणूक अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.


0 Comments