संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि रमजान ईद रंगपंचमी होळी शिवजयंती गुडफायडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती श्रीराम नवमी हनुमान जयंती अशा विविध धार्मिंक सणांच्या अनुषंगाने कोरेगांव पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोरेगांव शहरांतून रूट मार्च करण्यात आला. या पायी रुट मार्च ला कोरेगांव पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली हिंद भवन चौक आझाद चौक कोरेगांव सातारा रोड बाजारपेठ आंबेडकर नगर चौथाई गल्ली भैरवनाथ मंदिर गरुड गल्ली पुन्हा पोलीस ठाण्याकडे प्रस्थान झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ स.पो.नि. रोहित दिवसे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्यासह कोरेगांव आणि रहिमतपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी तसेच सीआरपी तुकडीतील जवान यांनी देखील या रुट मार्चमध्ये सहभाग नोंदवला होता.


0 Comments