संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाठार पोलिसांचा ग्रामीण भागातील गावांमधून रूट मार्च काढण्यात आला. सदरचा रूट मार्च हा पिंपोडे बु बाजार पेठ - गणेश मंदिर - पिंपोडे मस्जिद - झेंडा चौक - एसटी स्टँड परिसर तसेच वाठार स्टेशन ते वाई चौक- रेल्वे स्टेशन - पोलीस स्टेशन - वाग्देव चौक ते अंबवडे संमत वाघोली ग्रामपंचायत ते भैरवनाथ मंदिर - अंबवडे सं वा चौक असा रूट मार्च काढण्यात आला. सदरचा रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अशोकराव हुलगे यांच्यासह पोलिस ठाण्यातील अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच सीआरपी तुकडीतील जवानांनी या रूट मार्चमध्ये सहभाग नोंदवला होता.


0 Comments