LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रातील मोदी आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारी धोरणांची, वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, बोगस स्मार्ट सिटी, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या जुलमी सरकारची होळी :- चेतन नरोटे

दिनांक :- 24 मार्च 2024

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारी धोरणांची होळी काँग्रेस भवन शेजारी करण्यात आली.

यावेळी बोलताना काँग्रसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, केंद्रातील मोदी आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारी धोरणांची, वाढती महागाई, बेरोजगारांची झोप उडवून निद्रिस्त झालेल्या  तसेच भ्रष्टाचार, इलेक्ट्राल बाँड, बोगस स्मार्ट सिटी, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या, इडी सारख्या संविधानिक संस्थांचां गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देणाऱ्या, सर्वसामान्यांची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी आणि खोके सरकारचा होळी करण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार, गलिच्छ राजकारण, महागाई, बेरोजगारी यांस कारणीभूत असणाऱ्या मोदी आणि राज्य सरकारला जनता हद्दपार करणार आहे.

या होळी दहन कार्यक्रमात महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, मा. नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, देवाभाऊ गायकवाड, दत्तू बंदपट्टे, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, सिद्धाराम चाकोते, अनिल मस्के, संजय गायकवाड, सागर उबाळे, लखन गायकवाड, विवेक कन्ना, शिवशंकर अंजनाळकर, सुनील व्हटकर, जितू वाडेकर, सुभाष वाघमारे, प्रतीक लिगाडे, किरण खरात, धीरज खंदारे, रेखा बिनेकर, रविकांत कल्याणकर, राजेश झंपले, चंद्रकांत नाईक, नागेश नाईक, वर्षा अतणुरे यांच्यासह इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments