*आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि धार्मिंक सण उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रहिमतपूर पोलिसांचा रूट मार्च
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे चांगलेच वाहत आहे. याकरिता लोकसभा सर्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी धार्मिंक सण उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्था अबावित राहण्यासाठी कोरेगांव तालुक्यातील रहिमतपूर शहरांतून व ग्रामीण भागातील गावांमधून रहिमतपूर पोलिसांनी रूट मार्च काढला, सदरचा रूट पोलीस ठाण्यापासून ते बस स्थानक ते गांधी चौक ते रोकडेश्वर मंदिर ते भैरोबागल्ली बागवान टेक ते नगरपालिका गांधी चौक आर्वीं वाठार किरोलीसह पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावातून हा रूट मार्च संपन्न झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजीराव विभूते पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे रहिमतपूर पोलीस ठाण्यातील १२ कर्मचारी बीएसएफचा एक अधिकारी व २० जवान असे एकुण ३५ अधिकारी कर्मचाऱ्यांनी या रूट मार्चमध्ये सहभाग नोंदवला होता.


0 Comments