संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत असलेल्या वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे विभाजन करून आठ महिन्यांपूर्वी नवीन सुपा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकुण २४ गावे आहेत. या पोलीस ठाण्यासाठी एकुण ५५ पदे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी सध्या सुपा पोलीस ठाण्यात सध्या एक पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षकांसह ४४ पोलीस अंमलदार सध्या कार्यरत आहेत. सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील यांनी पदभार घेतल्यापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत. प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील आणि पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या उत्कृंष्ट कामकाजा बाबत आयजीकडुंन विशेष कौतुकाची थाप... सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सन २०२३-२४ या कालावधीत उत्कृंष्ट कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. सुनील फुलारी व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. पंकज देशमुख यांच्या हस्ते प्रशासकीय पत्रक देवुन विशेष सन्मान करण्यात आला.


0 Comments