सोलापूर : दि 22 (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या 31 जिल्ह्यातील महादेव कोळी जमातीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न रेंगाळत ठेवला आहे .त्यामुळे भाजपाविषयी समाजात प्रचंड नाराजी सुर उमटत आहे असे मत समाजाचे गाडे अभ्यासक प्रा बाळासाहेब बळवंतराव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
2011 च्या जनगनना अहवालानुसार राज्यात1 कोटी 5 लाख 272 एवढी आदिवसीची संख्या आहे.
ही महाराष्ट्राच्या एकुण लोकसंखेच्या 9%. आहे. अनुसूचित जमातीच्या सवलतीस पात्र यादीमध्ये 45 जमाती आहेत
आदिवासी क्षेत्राच्या अहमनगर ,नाशिक, ठाणे, पुणे, पालघर या पाच जिल्ह्यात एक कोटी पाच लाख 272 पैकी फक्त 43 लाख आदिवासी व12 ते 13 जमाती राहतात .तर आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील 31 जिल्ह्यात 61 लाख आदिवासी व 33 जमाती राहतात. त्यात महादेव कोळी जमातीची लोकसंख्या 40 ते45 लाख एवढी आहे.
आदिवासी क्षेत्राच्या पाच जिल्ह्यातून 9% प्रमाणे 25 आमदार व 4 खासदार सातत्याने निवडून जातात. त्यांची संख्या निश्चित करतांना आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील31 जिल्हयातील लोकसंख्य गृहीत धरली आहे.
या आदिवासी आमदार खासदारांनी आदिवासी विभागावर येथे कब्जा केला असून सवलतीस पात्र 45 जमातीपैकी आपल्याच भागातील 12 ते 13 जमातीला शैक्षणिक ,राजकीय, नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील महादेव कोळी जमातीसह33 जमातीला सत्तेच्या बळावर बोगस ठरवतात. 75 वर्ष झाले या महादेव कोळी जमातीसह33 जमाती बळीचा बकरा बनल्या आहेत.
तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारने हा अन्याय दूर केला नाही. म्हणून कोळी जमातीच्या 40 ते 45 लाख लोकांनी 2014 ला भारतीय जनता पार्टीला मतदान करून सत्तेत आणले होते. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री ही झाले .आज पर्यंत दहा वर्षे समाज कोळी समाज आशेने देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पहात होता की, ते या दिलेल्या मतांची परतफेड करतील. अन्यायग्रस्त आदिवासी महादेव कोळी जमातीचा प्रश्न समजून घेतील त्यांच्या बाजूने उभे राहतील व त्यांना न्याय मिळवून देतील. परंतु त्यांनी समाजाचा जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राचा प्रश्न मात्र सोडवला तर नाहीच .तसाच तो त्यांनी त्यांनी रेंगाळत ठेवला आहे .त्यामुळे सवलती विना कोळी समाज पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. तो माघास राहिला आहे . मतदान देऊन सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सोडवला नसल्यामुळे समाजामध्ये नाराजी पसरली असून चिढ निर्माण झाली आहे. भाजपाला कोळी समाजाच्या 40 ते 45 लाख लोकांच्या मतांची गरज त्नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
31 जिल्ह्यातील 45 लाख कोळी जमातीचे लोक भारतीय जनता पार्टीला मतदान का करायचे असा प्रश्न विचारत आहेत. जसे 2014 ला कोळी जमातीने मतदान करून भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणलेले श्रेय घेत आहेत तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करून त्यांचे उमेदवार पाडण्याचे श्रेयही कोळी समाज नक्की घेईल. आज कोळी जमातीच्या अभ्यासकांनी व्हाट्सअप, फेसबुक, इस्टाग्राम, ट्वीटर या सोशल मीडियाच्या व चर्चा, मेळावे, मोर्चे प्रत्यक्ष भेटी या माध्यमातुन प्रचंड जागृती केली आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाकडे ताबडतोब लक्ष घालून कोळी जमातीच्या अभ्यासकांना बोलवून प्रश्न समजावून घेऊन आदिवासीचे जे 25 आमदार आणि 4 खासदार कोळी जमातीवर अन्याय करत आहेत तो अन्याय दूर करुन जमातीला जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सुलभ पध्दतीने देण्याचा शासन आदेश काढण्याची हमी दिली तर महाराष्ट्राचे चित्र बदलु शकते.
तसेच माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात अन्यायग्रस्त महादेव कोळी जमातीचे अनुक्रमे एक ते सव्वा लाख व एक लाख मतदान आहे. त्यामुळे या दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनाही फटका बसू शकतो. असे मत प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी व्यक्त केले आहे.


0 Comments