अडीच लाखांचे १७ मोबाईल केले परत, वाई पोलीस ठाणे हद्दीमधून चोरीला, गहाळ झालेले मोबाईल पुन्हा मालकांना, वाई पोलीसांची कामगिरी
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी वाई पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नेहमीच प्रयत्नशील, वाई पोलीस ठाण्याच्या हिंदीमध्ये यात्रा लग्नाची बाजाराच्या दिवशी भाजी मंडई बस स्थानक अशा परिसरांतून चोरीला गेलेल्या मोबाईलचे प्रमाण चांगलेच वाढले होते. याची गंभीर दखल घेवुन वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून चोरीला गेलेले गहाळ झालेले मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून शोध घेण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी केले होत्या. तपास पथकांने सीईआयआर पोर्टलच्या माध्यमांतून गाळ झालेल्या मोबाईल फोनचा निरंतर शोध घेतला नामांकित ब्रँडच्या जवळपास सुमारे अडीच लाख रुपये किंमतीच्या १७ मोबाईलचा विविध ठिकाणाहून शोध घेवुन सदर मोबाईल हे मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे स.पो.नि.वैभव पवार उपनिरीक्षक बिपीन चव्हाण सुधीर वाळुंज पोलीस शिपाई प्रसाद दुदुस्कर राम कोळी हेंमत शिंदे नितीन कदम श्रावण राठोड विशाल शिंदे यांनी केली आहे. यशस्वी कारवाई बद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम यांनी वाई तपासी पथकांचे विशेष कौतुक केले,_


0 Comments