मतदानाला दांडी मारण्याचा विचार असेल तर सावधान हिंगोली जिल्ह्यात चिमुकल्याचे पालकांविरोधात गोरेगांव पोलिसांना पत्र,
संभाजी पुरीगोसावी ( हिंगोली जिल्हा ) प्रतिनिधी. देशभरात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जगात सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती सुरु केली आहे. प्रत्येक मतदाराने मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान करुन सुद्धा अनेक जण मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या सुट्टींचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळे प्लॅन आखत आहेत. हिंगोली जिल्ह्यात देखील एका कुटुंबाने मतदानाच्या दिवशी दांडी मारुन देवदर्शनाला जाण्याचा बेत आला होता. मात्र आई-वडिलांचे संभाषण ऐकून एका चिमुकल्याने थेट पोलिसांनाच पत्र लिहिले आहे. एखाद्या चित्रपटात घडावी अशी घटना ही हिंगोलीच्या सेनगांव तालुक्यांतील ताकतोडा गावामध्ये घडली आहे.या गावातील साईराम कैलास सावके या चिमुकल्यांने गोरेगांव पोलिसांना खरमटीत पत्र लिहून लोकशाहीच्या उत्सवाला दांडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई-वडिलांना धडा शिकवला आहे. हा चिमुकला हे पत्र घेवुन जेव्हा गोरेगांव पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यातील कर्मचारी देखील भारावून गेले होते. यावेळी गोरेगांवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी चिमुकल्याची समजूत काढत त्यांच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली.


0 Comments