अन्यथा कारवाई सामोरे जावे लागले, डी. वाय. एसपी सौ. रोहिणी साळुंखे हातकणंगले पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न,
संभाजी पुरीगोसावी ( कोल्हापूर जिल्हा ) प्रतिनिधी. आगामी लोकसभेची निवडणूक भयमुक्त व्हावी निवडणुकीच्या प्रचारामध्ये वैयक्तिक टीकाटिपणी करू नये तसेच सोशल मीडियावर तसेच व्हाट्सअप ग्रुपवर देखील सायबर विभागाकडूंन करडी नजर ठेवली जाणार आहे. जातीय तेढ निर्माण होईल असे कोणतेही वादग्रस्त पोस्ट टाकू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा जयसिंगपूर विभागाच्या डी.वाय.एसपी सौ. रोहिणी साळुंखे यांनी दिला आहे. त्या हातकणंगले पोलीस ठाण्याच्या आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होत्या यावेळी डी.वाय.एसपी रोहिणी साळुंखे मॅडम पुढे म्हणाल्या... की एप्रिल महिन्यांत रामनवमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रमजान ईद सारखे अनेक धार्मिंक सण उत्सव व जयंत्या साजरा होणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. या सर्वच अनुषंगाने सामाजिक कार्यक्रम शांततेत तसेच कार्यक्रमासाठी रात्री दहापर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे. यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर पुढे म्हणाले... आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करून पुढील येणाऱ्या धार्मिंक सणाच्या व जयंतीच्या मिरवणुका काढताना प्रत्येकांने पूर्व परवानगी घेणे अत्यंत गरजेचे आहे धार्मिंक स्थळ अथवा मंदिरासमोर मिरवणूक रेंगाळुन देवु नये. डॉल्बीचा वापर टाळावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल सर्वांनी जातीय सलोखा ठेवला पाहिजे, तर पार पडा या शांतता बैठकीच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती जयसिंगपूर विभागाच्या डी.वाय.एसपी सौ. रोहिणी साळुंखे हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर नगरसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य शांतता समिती सदस्य यांच्यासह पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील नागरिकांची यावेळी बहुसंख्येने उपस्थिती होती.


0 Comments