संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. सौ: मोनिका नंदकुमार राऊत या महिला पोलीस अधिकारी असल्याने त्या आजही ज्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी जातात. त्या ठिकाणी प्रथम पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोयी सुविधांची आवर्जून चौकशी आणि पाहणी करतात... नोकरी करुन संसाराचा गाडा ओढणे वाटते तितके सोपे नसते, परंतु तरीही महिला या दोन्ही जबाबदारी तितक्याच यशस्वीरित्या सांभाळताना पाहावयास मिळतात, त्यातही पोलीस दलासारख्या अतिशय जबाबदारीच्या क्षेत्रात नोकरी करताना टाईम बॅलन्स अन् आपल्या जोडीदाराची साथ असेल तर कोणतीही जबाबदारी महिला सहज पेलू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक शहरांच्या पोलीस उपायुक्त सौ: मोनिका नंदकुमार राऊत... मोनिका राऊत मूळच्या सातारा जिल्ह्यांतील आहेत.बी. कॉम ची पदवी घेतल्यानंतर त्यांना खरंतर सीए व्हायचे होते. परंतु याचदरम्यान त्यांचा नंदकुमार राऊत यांच्याशी विवाह झाला, नंदकुमार राऊत हे लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून शासनांच्या सेवेत होते. सध्या ते मंत्रालयात उपसचिव या पदावर कार्यरत आहेत. त्यांनीच मोनिका राऊत यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रोत्साहन दिले होते. अर्थात त्यासाठी त्यांना सासरच्यांनीही आशीर्वाद देत प्रोत्साहित केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दोनवेळा अपयश आले, परंतु खचून न जाता आणि नंदकुमार यांची प्रेरणा घेवुन त्या पुन्हा जोमाने अभ्यासाला लागल्या अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी ठरल्या, आणि २००७ मध्ये त्यांची पोलीस उपअधीक्षकांचे प्रशिक्षण नाशिकच्याच महाराष्ट्र अकादमीममध्ये झाले, सौ: मोनिका राऊत या महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्यापासून त्यांनी आजपर्यंत विविध पदावर आणि अति संवेदनशील परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्या पार पाडल्या, ठाणे मुंबई नागपूर अकोला यास काही विशिष्ट समित्यांवर काम करताना त्यांनी आपल्या कामाची वेगळीच छाप सोडली होती. राऊत दाम्पत्यांस दोन अपत्य मोठी मुलगी एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला तर लहान मुलगा आठवीच्या वर्गात शिकत होता, पती नंदकुमार हे नोकरीमुळे मुंबईला तर मोनिका राऊत या सतत बदल्यामुळे फिरस्ती परंतु अशा स्थितीतही केवळ टाईम बॅलन्स च्या माध्यमांतून मुलांचे शिक्षण, त्यांचा होमवर्क आजही त्या स्वतःच घेतात कोणत्याही प्रसंगी ड्युटी फर्स्ट ला प्रधान्य असले, तरी कुटुंबातील स्वतःची जबाबदारी त्यांनी तितक्याच गांभीर्याने नोकरी आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या सौ: मोनिका नंदकुमार राऊत या यशस्वीरित्या पार पडत आहेत. महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग लेडी ! महिला अधिकारी म्हणून सौ: मोनिका राऊतांची ओळख आहे.


0 Comments