पंढरपूर प्रतिनिधी -
वाखरी येथील श्री. लक्ष्मणदास महाराज यांच्या 08/06/2024 रोजी होणाऱ्या 117 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक 03/04/2024 रोजी श्री. लक्ष्मणदास महाराज यांचे चरित्र व कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे : संजय मोरे सर प्राचार्य माध्यमिक आश्रम शाळा वाखरी अध्यक्ष म्हणून जि. प.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक भालेराव सर जि. प. सदस्य नानासो गोसावी, सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी, विद्यार्थिनी उत्स्फूर्ततेने यांनी उपस्थिती दर्शविली. ह्याचे प्रास्ताविक विश्वस्त श्री. बाळासाहेब ज्ञानोबा पोरे यांनी प्रस्ताविकामध्ये महाराजांच्या चरित्राचा प्रसार सर्व ग्रामस्थांमध्ये होण्याचा उद्देश सांगितला. या स्पर्धेसाठी 66 विद्यार्थिनी व 30 विद्यार्थी उत्स्फूर्ततेने सहभाग नोंदविला असे प्रास्ताविक मध्ये सांगितले गेले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री सचिन आवताडे सर, व श्री राजेंद्र जाधव सर यांनी काम पाहिले. यावेळी एलआयसी ऑफिसर रणजीत जगताप, तुकाराम पोरे, ग्रामपंचायत सदस्य आगतराव पोरे, सुधाकर गायकवाड सर, भारत मेटकरी, नितीन पोरे, पांडुरंग पिसे, डॉक्टर गणपत पोरे , सचिन चव्हाण सर, आबासाहेब पोरे, विक्रम घोडके ग्रामपंचायत सदस्य सर्व वाखरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त श्री. धनंजय पोरे सर यांनी केले.


0 Comments