दौंड पोलिसांनी केली गावठी दारूभट्टी उध्वस्त ! मालक अटकेत ! शहर व परिसरांतील अवैध धंद्यांचा समूळ नायनाट करणार पोलीस निरीक्षक संतोष डोके
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी. पुणे ग्रामीण विभागातील येणाऱ्या दौंड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची दौंड पोलीस ठाण्यात बदली झाली होती. आणि त्यांच्या पुन्हा अचानक बदलीनंतर पुन्हा दौंड पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची नियुक्ती झाली असून. पोलीस निरीक्षक संतोष डोके हे एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची पोलीस प्रशासनात ओळख आहे. दौंड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे व्यवसायिकांचे देखील चांगलेच धाबे दणाणले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुषंगाने दौंड तालुक्यांतील बोरीबेल गावात गावठी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकून गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करून दारूभट्टी उध्वस्त केली आहे. याप्रकरणी मनोज उर्फ मन्या निर्माण चव्हाण (रा. बोरीबेल दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे महेंद्र लोहारे यांच्या पथकांने सदर ठिकाणी जावुन छापा टाकला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरून मनोज उर्फ मन्या चव्हाण हा बोरीबेल गावच्या हद्दीत खळदकर वस्ती परिसरांत हातभट्टीची दारू बनवून त्याची विक्री करीत असल्यांची माहिती दौंड पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशावरून दौंड पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन छापा टाकला... यामध्ये गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य (रु.२३ ह. ५००) मिळाले पथकाने सर्व रसायन व साहित्य जागीच नष्ट करून दारूभट्टी मालकावर भा.द.वि.कलम ३२८ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९चे कलम ६५ ख. ( ग ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहर व परिसरांत चालणाऱ्या अवैध धंद्यांवर अशाच प्रकारे कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे. असा इशारा देखील पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिला आहे.


0 Comments