संभाजी पुरीगोसावी (भंडारा जिल्हा ) प्रतिनिधी. सध्या देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या आगामी धार्मिंक सण उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे आणि शांततापूर्ण पद्धतीने आपला मतदानाचा अधिकार बजवावा. तसेच जनतेमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने भंडारा जिल्हा आणि जिल्हा पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांची आकाशवाणी केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था बाबतीत दिलखुलास मुलाखत होणार आहे. या कार्यक्रमात भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांची मुलाखत... लोकसभा निवडणुकीच्या पूर्वातयारी संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांची कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर मंगळवारी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्युज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळी ७:२५ ते ७: ४० या वेळेत प्रसारित होणार आहे.


0 Comments