LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

धार्मिक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडखळ पोलिसांचा परिसरांतून रूट मार्च

संभाजी पुरीगोसावी ( रायगड जिल्हा ) प्रतिनिधी. सर्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि आगामी येणाऱ्या धार्मिंक सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडखळ पोलीसांनी पोलीस ठाण्याच्या ग्रामीण भागातून तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरांतून आणि शहरांतून काबू रूट मार्च काढण्यात आला. आगामी लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी  सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि व्यवस्था अबाधित रहावी. तसेच जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. या उद्देशाने वडखळ पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च करण्यात आला. सदरचा रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वाखाली पो.नि. पाटील स.पो.नि.गवई म.स.पो.नि.सांगळे यांच्यासह वडखळ पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी या रुट मार्च मध्ये सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments