LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विश्र्व मानव रूहानी केंद्र मोफत वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ प्रणिती भालके यांनी केले

पंढरपूर – आषाढी यात्रा कालावधीत लाखो वारकरी व भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीतून विश्व मानव रुहानी केंद्र धर्मादाय संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रणिता ताई भालके यांचे शुभहस्ते करण्यात आले.  
*संस्थेच्या या उपक्रमामुळे यात्रेतील भाविकांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध झाली असून, अनेक वारकऱ्यांनी संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. आषाढी यात्रेसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम समाजहिताचा असून, भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असल्याचे मत नगराध्यक्षा प्रणिता ताई भालके यांनी व्यक्त केले.* 
पंढरपूर येथील गजानन महाराज भक्त निवास समोर मोफत वैद्यकीय शिबिर सुरू केले असून भाविकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.  यावेळी संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व सेवाभावी कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments