अनुजा कारखेले (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. उत्तर कोरेगांव तालुक्यांतील वाठार पोलिसांनी वाठार स्टेशन,कोरेगांव परिसरांत सुमारे अंदाजे 3 लाख रुपये किंमतीचे गहाळ झालेले जवळपास 26 मोबाईल शोधण्यात वाठार पोलिसांना यश आले आहे, त्यांच्या या कामगिरीचे वाठार परिसरांतून तसेच स्तरांतून विशेष कौतुक होत आहे, वाठार पोलीस ठाण्याचे नुकतेच नव्याने पदभार स्वीकारलेले स.पो.नि. अविनाश माने आता पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबावित राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत, वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोध घेण्यासाठी वाठार पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकांस सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने वाठार पोलिसांनी वारंवार संपर्क शोध मोहीम राबविल्याने नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल वाठार पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे, जवळपास एकूण 3 रुपये किंमतीचे 26 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत, दरम्यान संबंधित मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अविनाश माने गुन्हे प्रकटीकरण (डी.बी) पो.उपनि.नितीन भोसले पो. हवा. तानाजी चव्हाण प्रकाश चव्हाण पो.हवा. किशोर गिरी पो. कॉ. गणेश इथापे प्रतीक देशमुख म.पो.ना. आरती पवार मॅडम यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला, तसेच अशाच प्रकारे गुन्हे शोध मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही वाठार पोलीस ठाण्याचे स.पो.नि. अविनाश माने यांनी सांगितले आहे,


0 Comments