संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 6 जुलै ला सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे, तब्बल पाच दिवस पालखी सोहळा हा जिल्ह्यात मुक्कामी असणार आहे, त्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस दल देखील सज्ज झाले आहे, जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, हा बदल लक्षात घेवुन पालखी कालावधीमध्ये वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाकडूंन करण्यात आले आहे, दिनांक 6 जुलै ते 11 जुलै अखेर सातारा जिल्ह्यात मार्गक्रमण करणार असुन सदरचा पालखी सोहळा हा निरा-लोणंद फलटण मार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने तसेच पालखी सोहळ्यात लाखों भाविक सहभागी होणारा असल्याने पालखी जाणारे मार्गावरील कोणताही अपघात घडू नये वाहतूक समस्या निर्माण होऊ नये तसेच अनुचित प्रकार घडू नये याकरिता सातारा जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज असणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी प्रसार माध्यमांतून नुकतीच दिली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 प्रमाणे प्राप्त अधिकारन्वये पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज व अत्यावश्यक वाहने) खेरीच करून इतर सर्व बाणांना नीरा लोणंद पंढरपूर या मार्गावर दिनांक 6/7/24 जुलै ते 11/7/24 जुलै या कालावधीत प्रवेश पूर्णता बंद राहील, तरी सर्व बांधकांनी वेळपत्रकानुसार पर्यायी मार्गाचा वापर करून पोलीस प्रशासनाला पालखी सोहळ्यांच्या अनुषंगाने सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे,


0 Comments