पंढरपूर हे भारताचे दक्षिण काशी असे संबोधले जाते. या पंढरपूर येथे वर्षी काठी चार मोठ्या यात्रा भरत असतात. या पैकी सर्वात मोठी यात्रा आषाढी यात्रा सर्वात मोठी यात्रा भरते. ह्या यात्रे साठी मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली सोलापूर, आदी भागातुन पोलिस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक, महिला पोलिस, पोलिस, होमगार्ड, हे बंदोबस्तासाठी येत असतात. पण पोलिस कर्मचारी यांची पहावे तशी राहण्यासाठी सोय होतांना दिसत नाही . तसं पाहिलं तर सध्या पंढरपूर येथे श्री पांडुरंग रुक्मिणी मंदिर आहे . ह्या मंदिरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. तसेच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन, पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन, पंढरपूर शहर पोलिस स्टेशन, पंढरपूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा. ह्या कार्यरत आहेत. ह्या सर्व ठिकाणी नाही म्हटलं तरी ३०० ते ३५० पोलिस कर्मचारी आहेत. ह्या अनुषंगाने पंढरपूर येथे चार मोठ्या यात्रेत बाहेरील जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी तैनात करण्या पेक्षा पंढरपूर येथे च पोलिस उप मुख्यालय झाले तर सुयोग्य होईल. सध्या पंढरपूर येथे पोलिस बांधवांची जागा देखील आहे. महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी लक्ष देऊन पंढरपूर येथे पोलिस उप मुख्यालय केल्यास पोलिस बांधवांच्या समस्या सुटतील असे आम्हाला वाटते.


0 Comments