LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

राजकीय षडयंत्र करणाऱ्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूर शिवसेनेने केला निषेध...

पंढरपूर

राजकीय षडयंत्र करुन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेधाच्या घोषणा देवून कटकारस्थाचा निषेध करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे व आ. अनिल परब यांना खोट्या केस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न उघडला पडला.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणून खोटी शपथपत्र तयार करण्याचा डाव देशमुख यांनी हाणून पडला.

भाजप हे कुटील षडयंत्र या निमित्ताने उघडे पडले. विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करीत असून त्यांचा निषेध करण्यासाठी पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना 

पंढरपूर तालुका प्रमुख बंडूदादा घोडके, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, जयवंत आण्णा माने, शहर प्रमुख रविंद्र मुळे, शहर समन्वयक लंकेश दादा बुराडे, पंढरपूर उपतालुका प्रमुख पवन शिंदे, संजय घोडके, नागेश रितुंड, उत्तम कराळे, अजित शेवत्कार, अनिल रोंगे, मावली मसाळ, कल्याण कदम, पंढरपूर तालुका संघटक इंद्रजीत गोरे, तालुका समन्वयक अर्जुन भोसले, संजय पवार, बाळासाहेब पवार, युवासेना उपजिल्हा प्रमुख आकाश माने, युवासेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर, युवासेना पंढरपूर उपतालुका युवाधिकारी प्रणित पवार, समाधान गोरे, विजय जाधव, अतुल शितोळे, महेश इंगोले, बाबा पाटील, उपशहर प्रमुख विनय वणारे, हनुमंत भोसले, भारत कदम, उपशहर प्रमुख सचिन बंदपट्टे, विजय बागल, महिला आघाडी शहर संघटिका पूर्वा पांढरे, तालुका संघटिका संगीता पवार, शरीफा भाबी पठाण, लोकमान्य इनामदार, अंकुश विलास माने, बापू कोळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments