संभाजी पुरीगोसावी (अकोला जिल्हा) प्रतिनिधी. अकोला जिल्ह्यातील प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले आहे, कुलगाम जिल्ह्यात शनिवारी दहशतवादी हल्ला झाला यावेळी भारतीय लष्करांने चोख ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला, मात्र दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना दोन जवानांना वीरमरण आले आहे, यामध्ये अकोला जिल्ह्यातील एका जवानाचा समावेश आहे, यामध्ये प्रवीण प्रभाकर (वय 24) असे या शहीद झालेल्या जवानांचे नाव आहे प्रवीण हे मोरगांव भाकरे गावातील रहिवासी आहेत, सन 2020 मध्ये ते सेकंड महार बटालियन मध्ये भरती झाले होते, तेव्हापासून त्यांची पोस्टिंग ही माणिकपूरमध्ये होती, मात्र चार महिन्यांपूर्वी जवान प्रवीण जंजाळ यांना सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीने जम्मू-काश्मीर येथे पाठविण्यात आले होते, दुर्दैवी बाब म्हणजे... प्रवीण प्रभाकर जंजाळ यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले होते, दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना प्रवीण जंजाळ यांना वीरमरण प्राप्त झाल्याची वार्ता भारतीय लष्करांकडूंन जंजाळ यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती, यामुळे कुटुंबासह संपूर्ण मोरगाव भाकरे गावावर शोककळा पसरली आहे, जवान प्रवीण जंजाळ यांच्या पश्चांत पत्नी आई-वडील मोठा भाऊ असा त्यांचा परिवार होता, दरम्यान भारतीय लष्कराने दहशतवाद्यांशी केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत चार जणांना अखेर ठार केले आहे, आणि याच हल्ल्यात अकोल्यातील जवान प्रवीण जंजाळ यांच्यासह अन्य एक जवान शहीद झाला आहे, जंजाळ शहीद झाल्याची माहिती गावापर्यंत पोहोताच गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे,
0 Comments