LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांची वरिष्ठ श्रेणी पोलीस अधीक्षक पदोन्नती

 जिल्ह्यातच पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणार

 (अनुजा कारखेले ) रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणी पोलीस अधीक्षक पदी बढती मिळाली आहे, मात्र रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.धनंजय कुलकर्णी हे रत्नागिरी जिल्ह्यातच पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणार आहेत, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी ऑक्टोंबर 2022 मध्ये पदभार स्वीकारला होता, त्यानंतर राजापूर तालुक्यांतील बारसू येथील रिफायनरीचे ज्वलंत आंदोलन त्यांनी अतिशय स्वयमाने आणि आणि कौशल्याने हाताळले जिल्ह्याची सुरक्षा आणि सामाजिक सलोखा कसा राखला जाईल याबाबत नेहमीच सदैव दक्ष राहिले आहेत, अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे, अंमली पदार्थाच्या विक्रीचा देखील पडदाफाश करण्यात त्यांचे मोठे योगदान ठरले आहे, लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या उत्तम नियोजनामुळे जिल्ह्याभरांत कोठेही अनुचित प्रकार न घडता मतदान आणि मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडल्या, अतिशय शांत प्रसन्न आणि स्वयंमी व्यक्तिमत्व असलेले पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांची वरिष्ठ श्रेणी पदोन्नती मिळाली आहे, त्यांच्या पदोन्नतीचे वृत्त बुधवारी सायंकाळी उशिरा जिल्हा पोलीस मुख्यालयाकडे आले त्यांची वरिष्ठ श्रेणी पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती झाली असली तरीही त्यांच्याकडे रत्नागिरीचाच कार्यभार राहणार आहे, त्यांच्या पदोन्नती बद्दल सर्वत्र स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे,

Post a Comment

0 Comments