अनुजा कारखेले ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. श्री. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे आज सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरीत आगमन झाल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाकडूंन निरा पाडेगांव या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडूंन स्वागत करीत माऊलींचा सातारा जिल्ह्यात प्रवेश झाला, आणि या पायी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राप. सातारा विभागाकडूंन आज लोणंद नगरीत श्री. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यांच्या अनुषंगाने सातारा विभागाकडूंन वारकऱ्यांसाठी महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सदर उपक्रमास विकास खारगे साहेब ( प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय ) यांचीही प्रमुख उपस्थिती होती, तसेच विभागीय वाहतूक नियंत्रक रोहन पेलंगे साहेब विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड मॅडम यांच्यासह चालक वाहकांनी देखील दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांची सेवा करीत ही, या उपक्रमांत आपला सहभाग नोंदवला होता, या उपक्रमांतून अधिकारी वर्गातून तसेच चालक वाहक यांच्यातून पांडुरंग दिसून आला, यावेळी वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, यावेळी प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालयातील विकास खारगे साहेबांचे विभागीय वाहतूक नियंत्रक रोहन पलंगे यांनी त्यांचे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थित स्वागत केले, यावेळी बहुसंख्येच्या उपस्थित वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला,
0 Comments