संभाजी पुरीगोसावी
( पुणे शहर ) प्रतिनिधी पुणे शहर पोलीस दलात मागील दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार साहेब यांच्या आदेशात जवळपास 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते, पुणे शहर पोलीस दलात नेहमीच खांदेपालट दिसून येत आहे, मात्र आत्ताची खांदेपालट ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याची चर्चा सध्या पुणे शहर पोलीस दलात आहे, पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत बिबवेवाडी पोलीस ठाण्याला हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या हडपसर ठाण्यासह पुणे शहरांत विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा देणाऱ्या कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे मॅडम यांच्याकडे बिबवेवाडी पोलीस ठाण्याची आता नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांनी गुरुवारी सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्याकडूंन त्यांनी पदभार स्वीकारला आहे, यावेळी मावळते वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकरांनी मंगल मोढवे मॅडम यांचे स्वागत करीत बिबवेवाडी पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला,
0 Comments