LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बदलापूर येथे चिमुकल्या मुलींसोबत आणि कलकत्ता येथे झालेल्या महिला अत्याचार प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावीसोलापूर शहर महिला काँग्रेसची मागणी

बदलापूर येथे चिमुकल्या मुलींसोबत आणि कलकत्ता येथे झालेल्या महिला अत्याचार प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी
सोलापूर शहर महिला काँग्रेसची मागणी

सोलापूर, दिनांक :२१ ऑगस्ट २०२४

बदलापूर येथे चिमुकल्या मुलींसोबत आणि कलकत्ता येथे झालेल्या महिला अत्याचार घटनेचा निषेध करण्यासाठी आणि ही प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे निदर्शने आंदोलन करून निषेध व्यक्त करून निवेदन मा. तहसीलदार दिनेश पारगे यांना दिले. मा. जिल्हाधिकारी यांच्या वतीने त्यांनी निवेदन स्वीकारले.

 सोलापूर शहर महिला काँग्रेसने या निवेदनाद्वारे अशी मागणी केली की, बदलापूर मधील एका प्रतिष्ठित शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात केला. पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली. त्याच प्रमाणे पश्चिम बंगाल मधील आर. जी. कार. मेडिकल हॉस्पिटल मध्ये शिकत असलेल्या एका महिला डॉक्टर वर काही नराधमांनी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या NDA सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या निष्क्रियतेपणामुळे देशात आणि महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढतच चाललेल्या आहेत. बलात्कार करून हत्या केल्या जात आहेत. देश आणि महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न वेशीवर टांगला आहे. त्यामुळे केंद्रातील NDA सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विरुद्ध जनतेत प्रचंड रोष निर्माण होऊन रस्त्यावर उतरत आहे. देशात आणि राज्यात बहिणी तर सुरक्षित नाहीतच पण आता तीन चार वर्षाच्या लेकीसुद्धा सुरक्षित नाहीत, हे आज सिध्द झालेला दिसत आहे. अश्या प्रकारच्या महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असून पोलीस आणि सरकारची भिती गुन्हेगारात राहिलेली नाही. म्हणून बदलापूर येथे चिमुकल्या मुलींसोबत व कलकत्ता येथील झालेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे. सदर प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवून नराधम आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.
तसेच महायुती सरकार महिलांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही. निष्क्रिय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, शिक्षण मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निषेध आंदोलनात माजी महिला अध्यक्ष अँड करिमुनिसा बागवान, हेमाताई चिंचोळकर, माजी नगरसेविका भारतीताई ईप्पलपल्ली, आशाताई म्हेत्रे, शोभा बोबे, संध्या काळे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, चंदा काळे, रेखा बिनेकर, अरुणा बेंजरपे, रुकय्याबानू बिराजदार, सुनिता शेरखाने, लता सोनकांबळे, सलीमा शेख, मुमताज शेख, रोहिणी धोत्रे, आशा गायकवाड, जाहेदा नदाफ, विजयलक्ष्मी झाकणे, सविता सोनवणे, अनिता भालेराव, पुष्पा तुळसे यांच्यासह बहुसंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments