संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार नवनियुक्त पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी स्वीकारला ...! कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल,...! संभाजी पुरीगोसावी ( अहमदनगर जिल्हा) प्रतिनिधी. नगर जिल्हा पोलीस दलात मागील काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल करून मोठी खांदेपालट केली होती, यामध्ये सोळा पोलीस निरीक्षक अकरा ( स. पो. नि.) आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, तसेच नव्या पदस्थापने ठिकाणी अधिकाऱ्यांनी पदभारही घेतला आहे, यामध्ये प्रामुख्यांने संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी नुकताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी त्यांचे स्वागत करीत पदभार सोपविला आहे. पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यापूर्वी अहमदनगर जिल्हा विशेष शाखेत कार्यरत होते, खाकी वर्दीतील आपलेपणा जपणारा आणि सर्वांना सोबत घेवुन काम करणारा पोलीस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते, पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी आजपर्यंत विविध जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा दिली, तर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनीही आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी कोपरगांव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याकडून तेथील पदभारही तात्काळ स्वीकारला आहे, कोपरगांव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची शिर्डी वाहतूक शाखेचा पदभार सोपविण्यात आला आहे, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनीही कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात आपल्या कार्यकाळात पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे
0 Comments