LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी कोंढवा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर संतोष सोनवणे यांची वाहतूक शाखेत बदली

 


, संभाजी पुरीगोसावी 

( पुणे शहर ) प्रतिनिधी पुणे शहर पोलीस दलात मागील दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार साहेब यांच्या आदेशात जवळपास 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते, पुणे शहर पोलीस दलात नेहमीच खांदेपालट दिसून येत आहे, पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत कोंढवा पोलीस ठाण्याला बिबवेवाडी पोलीस ठाण्यासह पुणे शहरांत विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा देणारे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्याकडे कोंढवा पोलीस ठाण्याची आता नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांनी गुरुवारी रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्याकडूंन पदभार स्वीकारला आहे, यावेळी मावळते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी विनय पाटणकर यांचे स्वागत करीत कोंढवा पोलीस ठाण्याचा पदभार सोपविला आहे,

Post a Comment

0 Comments