इंदापुरात बॉम्ब सापडले पण एक-दोन नव्हे तर तब्बल ९ वालचंदनगर पोलिसांनी वेळीच केला गेम, आरोपींच्या आवळल्या मुसक्या, संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या असून इंदापूरमध्ये एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे, दरोड्याची योजना आखणाऱ्या एका दरोडेखोराला वालचंदनगर पोलिसांनी सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत, टीव्हीवर आणि चित्रपटांत शोभतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यांतील वालचंदनगर पोलिसांनी दरोडेखोरांकडूंन ताब्यांत घेतले त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी एकाला ताब्यांत घेतला आहे, सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके ( वय 23 रा. कळंब ता. इंदापूर जि.पुणे ) असे आरोपींचे नाव आहे, याबाबत आता वालचंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, वालचंदनगर पोलिसांनी एक-दोन नव्हे तर तब्बल ९ बॉम्ब पिस्तूल आणि तलवारी कोयते घेवुन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळीच सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिली आहे, वालचंदनगर पोलिसांनी ऐंन गणेशोत्सव ईद.ए मिलादच्या मुहूर्तावर केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, यामध्ये आरोपी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके (रा. कळंब ) याचा वालचंदनगर पोलिस शोध घेत होते, यावेळी तो वालचंदनगर येथील अंजली बालमंदिर क्र-१ येथील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी -३ मधील खोलीत त्याच्या मित्रांसमवेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार वालचंदनगर पोलीस ठाण्यातील पो. हवा. शैलेश स्वामी पो. हवा. काटकर पो. हवा. बनसोडे पो.कॉ. चितकोटे पो. कॉ. चोपणे पो.कॉ. सोनवणे पो.कॉ. निता किर्दक यांच्या पथकांने बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकुमार डुगणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर आरोपींला ताब्यांत घेतले आहे, यात पोलिसांनी त्यांच्याकडूंन तीन गावठी पिस्तूल मॅग्झीन सहीत एक खाली मॅग्झीन दोन जिवंत काढत असे ( राऊंड ) 14 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल दोन लोखंडी चाकू एक मूठ नसलेले तलवारीचे पाते आणि ९ सुतळी बॉम्ब असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, वालचंदनगर पोलिसांच्या कामगिरीबद्दल पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस प्रमुख अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी,कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे
0 Comments