सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेखच, निवडणुका काळ एसपींची बदली होणे अपेक्षित होते, जिल्ह्याच्या एसपींना कुणाचा आशीर्वाद...? संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची २० दिवसांपूर्वी अचानक बदलीचे आदेश होऊन नूतन एसपी म्हणून डॉ.सुधाकर बी. पठारे यांचे नाव पुढे आले होते, मात्र आदेशानंतर अवघ्या तीनच तासांतच एसपींच्या बदलीला ब्रेक लागलाय आहे, याबाबत गृह विभागाने बदल्यांचे आदेश काढित एसपी डॉ. सुधाकर पठारे यांची बृहन्मुंबई येथे बदली केली आहे, त्यामुळे साताऱ्यात पोलीस अधीक्षकपदी समीर शेखच राहणार असल्यांचे चांगलेच स्पष्ट झाले आहे, एसपी समीर शेख यांची नोव्हेंबर 2022 मध्ये गडचिरोलीतून साताऱ्यात बदली झाली होती, सातारच्या पोलीस दलाच्या इतिहासांत असे प्रथमच घडले आहे, खरतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे एसपींची बदली होणे अत्यंत गरजेचे होते, मात्र एसपींच्या बदलीला अखेर ब्रेक लागला, मात्र एसपींना नक्की आशीर्वाद कुणाचा मिळाला ? हे अद्याप समोर नाही, मात्र पुढील आदेश होईपर्यंत सातारा एसपींना जिल्हा सोडू नये असे गृह विभागांच्या आदेशात म्हटले पण या नाट्यमय घडामोडीनंतर साताऱ्यासह राज्य पोलीस दलात चांगलीच चर्चा रंगली आहे
0 Comments