LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली

पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली, संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. पुणे शहराचे पोलीस उपआयुक्त संदीप सिंह गिल यांची पुणे जिल्हा ( ग्रामीण ) पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बृहन्मुंबईच्या पोलीस उपआयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे, महाराष्ट्र शासनांच्या गृह विभागाने आज गुरुवारी उशिरा बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत, यात प्रामुख्याने दि. 31 जानेवारी 2024 रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांनी पदभार स्वीकारला होता, त्यांनी आपल्या कालावधीमध्ये पुणे ग्रामीण विभागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, नुकत्याच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांच्या त्यांनी अंतर्गत बदल्या केल्या होत्या, त्यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या रिक्त जागेवर आयपीएस अधिकारी संदीप सिंह गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे, आयपीएस अधिकारी संदीप सिंह गिल हे महाविद्यालयातील प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी असा त्यांचा प्रवास राहिला आहे, यशाचा प्रवास करीत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले पण जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशाला चांगलीच गवसणी घातली आहे, संदीप सिंह गिल यांची मातृभूमी पंजाब आहे, एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील जन्म कुटुंबाची परिस्थिती जेमतेम त्यात वडिलांचे लहानपणीच छत्र हरपलेले असल्यामुळे परिस्थिती जाणीव ही लहानपणीच झाली होती, महाराष्ट्र पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे.

Post a Comment

0 Comments