LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सातारच्या विद्यमान खासदार उदयनराजे महाराजांची लिंब गावात संभाजी पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट

सातारच्या विद्यमान खासदार उदयनराजे महाराजांची लिंब गावात संभाजी पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. आज रोजी ( ता. सातारा ) लिंब गावात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी कै: सोपानराव रामचंद्र पाटील यांच्या पुण्यतिथी निमिंत्त महाराजांनी पुष्पचक्र वाहून दर्शन घेतले, लिंबगाव चे सुरेशराव पोलीस पाटील यांच्या विनंतीला मान देवुन त्यांनी आपली उपस्थिती दाखवली, पोलीस पाटील आणि महाराजांचे अगदी कुटुंबाप्रमाणे जवळकीचे नातेसंबंध आहे, पाटील यांच्या कुटुंबाला देखील राजकीय,सामाजिक धार्मिंक असा वारसा लाभलेला हे कुटुंब आहे, याच दरम्यान संभाजी पुरीगोसावी यांनी आपला प्रथम परिचय देत महाराजांची सदिंच्छा भेट घेतली, माझ्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये महाराजांच्या भेटीचा प्रथमच योग घडून आला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आहेत, महाराष्ट्रांतील जनता आजही त्यांच्याकडे छत्रपती म्हणूनच पाहते त्याचप्रमाणे आदर देते, तसेच भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत, 2019 च्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून बहु मतांनी निवडून आले होते, शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळातही त्यांनी महसूल राज्य मंत्रिपदही भूषविले होते, उदयनराजे भोसले यांचा (जन्म 24 फेब्रुवारी १९६६) रोजी झाला, खासदार उदयनराजे भोसले यांच्या बद्दल सांगायचं झालं तर शब्द कमीच पडतील... असं महाराजांचं गोरगरीब तसेच सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र धावून येणारा नेता म्हणजे उदयन महाराजांचे नाव घेतले जाते, उदयनराजे भोसले यांच्या बद्दल एक वेगळा आदर सातारा वासियांच्या मनामनात आहे, दबंग खासदार म्हणून उदयनराजेंची ओळख आहे, उदयनराजे सामान्य जनतेत खूपच लोकप्रिय झाले आहे, सामान्य जनता आजही उदयन यांना राजे म्हणूनच पुकारते, खरं तर उदयनराजे एवढे लोकप्रिय आहेत की त्यांना मते मागण्यासाठी इतरांप्रमाणे प्रचार करावा कधीच लागला नाही, जनताच त्यांना आपले समर्थन जाहीर करते त्यांचा लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की देशात मोदीला लाट असतानाही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ५ लाखांहून अधिक मते मिळवली होती, तर 2019 मध्येही ते ३ लाखांहून अधिक मतांनी जिंकले होते, ते सातारा जिल्ह्यात एवढे लोकप्रिय आहेत की सर्वांना आपल्या कुटुंबातील मानतात आणि छोट्या छोट्या समारंभात देखील उदयन महाराजांची कायम उपस्थिती दिसून येते.

Post a Comment

0 Comments