LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कर्ज घेण्यासाठी च्या जाचक अटी लवकरच कमी करणारआमदार अमित गोरखे

अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कर्ज घेण्यासाठी च्या जाचक अटी लवकरच कमी करणार
आमदार अमित गोरखे

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाजाचां आथिर्क विकास होण्यासाठी मातंग समाज व तसम पोट जाती साठी महामंडळ तर्फे विविध योजना, कर्ज योजना राबविण्यात येतात,त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणे हा महामंडळ चा मुख्य ऊदेश आहे, दरम्यान महामंडळ तर्फे राज्य शासनाचे तसेच केंद्रिय महामंडळ मार्गदर्शक तत्तवा नुसार योजना राबविण्यात येते, परंतु या साठी लाभार्थी साठी कर्ज मंजूरी वितरण पूर्वी 2 जमीनदार देणे,जमीन तारण ठेवणे व शासकीय सेवेतील जामीनदार देणे असे नियम आहेत , जामीनदार अट तसेच जमीन तारण ही जाचक अटींमुळे प्रकरण दाखल करणे गरीब नागरिकांना अवघड असल्यामुळे या अटी रद्द करणे गरजेचे आहे...
मातंग समाजाचे शासकीय नोकरीचे प्रमाण राज्यांमध्ये अत्यंत अल्प असल्यामुळे व ह्या समजाच्या वडिलोपार्जित जमिनी नसल्याने असे जामीनदार लाभार्थ्यांना मिळत नाही ,यामुळे लाभार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झालेले असून या असलेल्या प्रमुख जाचक अटी कमी करण्यासाठी विधानपरिषद आमदार श्री अमितजी गोरखे यांनी माननीय मुख्यमंत्री व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर या अपत्य पत्रव्यवहार करून समक्ष चर्चा केली आहे,
व या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घ्यावा असे सुचित केलेले आहे.... याबद्दलचा निर्णय लवकरच येईल असे माननीय आमदार अमित यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments