मयत शुभांगी घाडगे या अत्यंत कष्टाळू आणि जिद्दीने जीवन प्रवास करत ज्योतीराम घाडगे आणि मुलगा साईराम यांच्यासह विविध क्षेत्रात नामवंत उल्लेखनीय काम करत सोन्याचे दिवस आणले होते परंतु काही दिवसापासून किडणीच्या आजाराने त्रस्त होत्या.त्यांच्या वर खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. दि.9 सप्टेंबर 2024 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.मृत्यू समयी त्यांचे वय 50 वर्ष होते.त्यांचे पश्चात पती ज्योतीराम घाडगे, मुलगा, सुन,असा परीवार आहे.
अत्यंत मनमिळाऊ आणि सहकार्यासाठी तत्पर असलेल्या शुभांगी घाडगे यांच्या आकस्मिक जाण्याने अकलूज व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा तिसऱ्याचा विधी दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा.अकलूज येथील वैकुंठभुमीत करण्यात येणार आहे

0 Comments