LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी ते राहाटेवाडी पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार..मंगळवेढा तालुक्यातील राहटे वाडी ते तामदर्डी या रस्त्यावरील पुलाचे काम गेली अनेक वर्ष प्रलंबित होते. त्यामुळे या भागातील लोकांची, विद्यार्थ्यांची पावसाळ्यात प्रचंड गैरसोय होत आहे. ओढ्याला पाणी आले की या गावांचा संपर्क तुटतो.

मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी ते राहाटेवाडी पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार..
मंगळवेढा तालुक्यातील राहटे वाडी ते तामदर्डी या रस्त्यावरील पुलाचे काम गेली अनेक वर्ष प्रलंबित होते. त्यामुळे या भागातील लोकांची, विद्यार्थ्यांची पावसाळ्यात प्रचंड गैरसोय होत आहे. ओढ्याला पाणी आले की या गावांचा संपर्क तुटतो.
या पुलाचे काम त्वरित सुरु करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मनसे नेते तथा पंढरपूर,-मंगळवेढा मतदार संघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना फोन करून सदर पुलाचे काम काम त्वरित सुरु करण्यासाठी सदर कामास मंजुरी देऊन निविदा प्रकिया त्वरित पूर्ण करून काम सुरु करण्याचे सांगितले.
यावेळी तामदर्डीचे रोहित पुजारी, मनोज चौगुले, प्रशांत पुजारी,योगेश आसबे, नागनाथ पुजारी, तम्मा पुजारी इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments