पंढरपुर: 8( प्रतिनिधी)
राज्यातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांची धाडस सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली आहे.
दि. 7 रोजी जिल्ह्यातील महादेव कोळी जमातीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक शिवसेना उपनेते शरददादा कोळी यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच वारंवार राज्य शासनाला विनंती करूनही जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवला नसल्याने राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात समाजबांधव उपोषण करीत आहेत. तरीसुद्धा हे सरकार अत्यंत निष्ठुरपणे वागत आहे .या सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकीत या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचे शरद कोळी यांनी सांगितले आहे.
तसेच यावेळी धाडस सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी कोळी जमातीचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र माजी नगरसेवक गणेशभाऊ अधटराव व शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या हस्ते देण्यात आले आहे. नूतन अध्यक्ष प्रा. बाळासाहेब बळवंतराव बोलताना म्हणाले समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना बरोबर घेऊन धाडस सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजावर अन्याय दुर करु. समाजातल्या लोकांच्या अडचणीसाठी धाडस सामाजिक संघटना सर्वतोपरी मदत करेल, कोणाला अडचण असल्यास संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी केले आहे.
यावेळी शिवसेना उपनेते शरद दादा कोळी, माजी नगरसेवक गणेशभाऊ अधटराव, सुभाष अधटराव, अरुणभाऊ लोणारी ,संतोष अण्णा पाटील, सेवानिवृत्त एपीआय हनुमंतराव माने, दादा करकमकर भारती कोळी, दुर्गा माने, सुरज खडाखडे, दत्तात्रय कोळी. राम कोळी, सरपंच औदुंबर कोळी, विजयकुमार कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील समाज बांधव व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments