या अभियानात माझ्यासह शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, सचिव, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी सहभागी होणार असून प्रत्येक शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा महायुती सरकारच्या टॉप १० योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश आ

0 Comments