LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उपकार दुधाचे आमदार शहाजीबापू पाटील विसरले. प्रा बाळासाहेब बळवंतराव.

उपकार दुधाचे आमदार शहाजीबापू पाटील विसरले.
          प्रा बाळासाहेब बळवंतराव.
पंढरपुर : ( प्रतिनिधी) 
          महादेव कोळी जमातीच्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार शहाजीबापू म्हणाले होते की, माझी आई मला जन्म देताच देवाघरी गेली होती. त्याच वेळी माझ्या शेजारी राहणाऱ्या महादेव कोळी जमातीची बाई बाळंत झाली होती.त्या मातेने मला व तिच्या बाळाला दूध पाजले होते. कोळी जमातीच्या दुधाचे माझ्यावर उपकार आहेत ते दुधाचे उपकार मी कधीच विसरणार नाही परंतु आमदार शहाजी बापू पाटील यांना दुधाच्या उपकाराचा विसर पडला असल्याचे मत कोळी जमातीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी म्हटले आहे.
महादेव कोळी जमातीचा लोकप्रतिनिधी विधानभवनात नसल्यामुळे महादेव कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्राचा व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न केली 40 वर्ष रखडला आहे. आदिवासी क्षेत्रातून निवडून येणारे आमदार महादेव कोळी जमातीला सातत्याने विरोधक करत आहेत आणि कोळी समाज ज्या प्रतिनिधींना मतदान करून आपला प्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवतात ते मात्र काहीही बोलत नाहीत त्यामुळे कोळी समाज अडचणीत आलेला आहे. सांगोला मतदार संघात महादेव कोळी जमातीचे दहा ते पंधरा हजार मतदानातून पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गट मतदार संघाला जोडला आहे. गेल्या पाच वर्षात आमदार शहाजी बापू पाटील या महादेव कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावर विधानसभेत एकदाही बोलले नाहीत. त्यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नाची जाणीव नाही का?प्रश्नच समजला नाही. महादेव कोळी जमातीच्या अतिसंवेदनशील प्रश्नावर आमदार शहाजी बापू पाटील भूमिका समाज विरोधी आहे. अशी चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत आहे त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारसंघात प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. भाषणात बोलताना ते म्हणतात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खूप जवळचे आहेत. त्यांच्या या संबंधाचा फायदा घेऊन मतदार संघातील महादेव कोळी जमातीला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवून द्यावे.अशी मागणी कोळी जमातीचे अभ्यासक बाळासाहेब बळवंतराव यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments